पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय स्टेट बँक (SBI) त्यांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एसबीआय प्लॅटिनम जुबिली आशा शिष्यवृत्ती २०२५’ हा महत्त्वाचा उपक्रम राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील २३,००० पेक्षा जास्त होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी १५ हजार ते २० लाख रुपयांपर्यंत वार्षिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
SBI ची CSR संस्था ‘एसबीआय फाउंडेशन’ ने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये शिष्यवृत्तीसाठी ९० कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे. ही शिष्यवृत्ती शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे आणि २०२२ मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अधिक सुलभ करणे आणि त्यांच्यातील सुप्त प्रतिभेला योग्य पाठबळ देणे हा आहे.
शिष्यवृत्ती कोणाला मिळणार ?
-
शालेय विद्यार्थी ( इयत्ता ९ वी ते १२ वी )
-
एनआयआरएफ ( NIRF ) टॉप ३०० किंवा एनएएसी ( NAAC ) ‘ए’ रेटेड संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी
-
आयआयटी ( IIT ) आणि आयआयएम ( IIM ) मधील स्कॉलर्स
-
वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना
-
परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना
-
टॉप २०० QS क्रमवारीत असलेल्या विद्यापीठांमध्ये मास्टर्स किंवा उच्च शिक्षण घेणारे अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) चे विद्यार्थी
पात्रतेचे निकष
-
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
-
मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५ % गुण किंवा ७.० CGPA आवश्यक.
-
कौटुंबिक उत्पन्न शालेय विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ३ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी, तर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ६ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी.