एसबीआय भरती 2025

मंडल स्थित अधिकाऱ्यांच्या ३५० जागांसाठी संधी

0
147
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

स्टेट बँक ऑफ इंडियाने ( SBI ) मंडल स्थित अधिकारी या पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र मंडळासाठी २५० पदे आणि मुंबई शहर मंडळासाठी १०० पदे, असे एकूण ३५० पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून ऑनलाइन परीक्षा याच महिन्यात होणार आहे.

रिक्त जागा विभागणी
महाराष्ट्र मंडळ – एकूण २५० पदे – ( SC – ३७, ST – १८, OBC – ६७, EWS – २५, UR – १०३), मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य
मुंबई शहर मंडळ – (महाराष्ट्र + गोवा) – एकूण १०० पदे – (SC – १५, ST – ७, OBC – २७, EWS – १०, UR – ४१),  मराठी व कोंकणी भाषेचे ज्ञान आवश्यक
पात्रता निकष
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता.
  • वयोमर्यादा ( ३० एप्रिल २०२५ पर्यंत ) :
    किमान वय – २१ वर्षे
    कमाल वय – ३० वर्षे
    ➤ जन्म १ मे १९९५ ते ३० एप्रिल २००४ दरम्यान असावा.
    ➤ SC/ST/OBC प्रवर्गासाठी वयामध्ये सवलत शासकीय नियमानुसार.
  • अनुभव :
    ➤ किमान २ वर्षांचा अधिकारी पदाचा अनुभव आवश्यक.
    ➤ अनुभव कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेतील किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेतील असावा.
    ➤ हा अनुभव शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतरचा असावा.
स्थानिक भाषेचे ज्ञान
  • ज्या मंडळासाठी अर्ज केला आहे त्या मंडळातील स्थानिक भाषेचे वाचन, लेखन व संवाद कौशल्य आवश्यक.
  • १० वी किंवा १२ वी मध्ये स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेल्यांना भाषा प्रवीणता चाचणीपासून सूट मिळेल.
  • इतर सर्व उमेदवारांना भाषा प्रवीणता चाचणी द्यावी लागेल.
निवड प्रक्रिया – चार टप्प्यांत होणार
  • ऑनलाइन परीक्षा
  • स्क्रीनिंग (Screening Process)
  • मुलाखत (Interview)
  • भाषा प्रवीणता चाचणी (Local Language Test)

पगार आणि भत्ते

  • मूळ वेतन: ₹ ४८,४८० पासून सुरू
  • वेतन श्रेणी: ₹ ४८, ४८० – २०००/७ – ६२, ४८० – २३४०/२ – ६७, १६० – २६८०/७ – ₹ ८५, ९२० 
  • याशिवाय :
    ➤ महागाई भत्ता
    ➤ घरभाडे भत्ता
    ➤ शहर भत्ता
    ➤ वैद्यकीय लाभ
    ➤ इतर भत्ते
  • हातात मिळणारा पगार : अंदाजे ₹ ६५,००० ते ₹ ७५, ०००  प्रतिमाह

कॉल लेटर आणि परीक्षा

  • ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर जुलै २०२५ पासून SBI च्या अधिकृत वेबसाइटवर (https://bank.sbi/web/careers/current-openings) उपलब्ध होत आहेत.
  • उमेदवारांनी वेबसाइटवर नियमितपणे भेट देऊन अपडेट्स तपासावेत.

एसबीआयसारख्या प्रतिष्ठित बँकेत अधिकारी होण्याची संधी सध्या उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि स्थानिक भाषेतील कौशल्य पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. योग्य तयारी आणि माहितीमुळे आपला निवड होण्याची शक्यता निश्चितच वाढेल.

————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here