कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गुगलच्या Gemini AI टूलचं अलीकडचं अपडेट हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलं तरी, यामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण, नव्या अपडेटनंतर Google स्वतःच्या मेलद्वारे स्पष्ट केलं आहे की Gemini आता तुमचे फोनमधील मेसेजेस, कॉल्स आणि WhatsApp चॅट्स वाचू शकतो आणि हे सगळं, तुमच्या परवानगीशिवाय तात्पुरतं सेव्ह केलं जाऊ शकतं.
नेमकं काय म्हणतं Google?
Google ने Android वापरकर्त्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे की : “लवकरच Gemini तुमच्या फोनवरील ॲप्स वापरण्यात तुम्हाला मदत करेल, जरी तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील Gemini ॲप्सची ॲक्टिव्हिटी बंद केली तरी.” याचा अर्थ असा की, वापरकर्त्यांनी AI activity control बंद केलं तरीही, Gemini ला काही मर्यादित डेटा ऍक्सेस मिळणार आहे.
विशेषत: WhatsApp चॅट्ससंदर्भात मोठा खुलासा
-
Google चा दावा आहे की, Gemini तुमचे चॅट्स कमाल ७२ तासांपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये सेव्ह करू शकतो.
-
म्हणजे, तुमची इच्छा असो वा नसो, तुमचा खासगी संवाद काही काळ कंपनीकडे सुरक्षितपणे स्टोअर होतो.
-
हे डेटाचे संग्रहण AI रेस्पॉन्स अधिक चांगले करण्यासाठी केले जाते, असं Google चं म्हणणं आहे.
गोपनीयतेसाठी धोका का ?
-
७२ तासांचा विंडो : ही माहिती तात्पुरती असली तरी, वापरकर्त्याचा स्पष्ट संमतीशिवाय AI ला चॅट्स मिळणं हे गोपनीयतेचं उल्लंघन ठरू शकतं.
-
AI Activity बंद असतानाही डेटा वापर : जरी यूजरने AI Activity Track बंद केली असली तरी काही मर्यादित डेटा सेव्ह होतो, हे धोकादायक संकेत आहेत.
-
WhatsApp चॅट्ससारखा संवेदनशील डेटा : हा संवाद सर्वसामान्यतः खाजगी आणि व्यक्तिगत असतो. तो तात्पुरता का होईना, स्टोअर करणं ही वापरकर्त्यांच्या हक्कावर गदा आहे.
काय करू शकतो वापरकर्ता ?
- Permissions तपासा – Google च्या My Activity आणि Account Settingsमध्ये जाऊन Gemini आणि Google Assistant ला दिलेल्या परवानग्या तपासून मर्यादित करा.
- Gemini वापरणं थांबा (हवं असल्यास) – Google Assistant सेटिंगमध्ये जाऊन Gemini सस्पेंड करता येतो.
- End-to-End चॅट्सबाबत जागरूक राहा – WhatsApp हे end-to-end encrypted आहे. पण जर Gemini ला तुम्ही स्क्रीनमधील माहिती वाचायची परवानगी दिली असेल, तर तो चॅटचा ‘व्हिज्युअल’ डेटा उचलू शकतो.
- AI Transparency पॉलिसी – Gemini आणि Google AI टूल्सच्या प्रायव्हसी धोरणांचा अभ्यास करा. कोणत्या गोष्टी वापरली जातात, ते समजून घ्या.
तंत्रज्ञान जितकं स्मार्ट होतंय, तितकंच ते तयारीनं आणि जागरूकतेनं वापरणं आवश्यक आहे. Gemini हे AI टूल तुमचं काम सोपं करतंय, पण त्यासाठी तुमच्या खाजगी माहितीकडे तात्पुरता प्रवेश मागतंय.डेटा हीच नवी संपत्ती आहे. ती कुणाच्या हातात द्यायची, हे ठरवणं तुमच्या हातात आहे.
————————————————————————————-