प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक
कोल्हापूर : डॉ. डी.वाय.पाटील ग्रुप व पाटाकडील तालीम मंडळातर्फे छत्रपती शाहू स्टेडियम येथे सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते पार पडला. तालमीचे ज्येष्ठ पांडबा जाधव व रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ 4 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान या स्पर्धा होत आहेत.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिका विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजयराव देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक प्रवीण केसरकर, संजय मोहिते, दुर्वास कदम, सुनिल मोदी, अर्जुन माने, अमर समर्थ गोकुळचे संचालक बयाजी शेळके, प्रकाश पाटील, जि.परिषदचे गटनेते एकनाथ पाटील, माजी सदस्य शशिकांत खोत, संदीप सरनाईक, अँड. तौफिक मुल्लाणी, यांच्यासह राजेंद्र ठोंबरे, शरद माळी, युवराज गवळी, डॉ.भरत कोटकर, शांकी मगदूम, धोंडीराम कांबळे, अभिलाश पाटील, संपत जाधव, विवेक दळवी, दिगंबर सरनाईक, अनिकेत घोटणे, कमलेश शिंदे, यश सरनाईक, पवन सरनाईक, उत्कृष फडतारे आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






