राजमान्यतेमुळे डिजिटल मीडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा : भाऊसाहेब फास्के

0
166
The Kolhapur city and district branches of the Digital Media Editors Journalists Association celebrated the festival by distributing Pedhas at the historic Dussehra Chowk.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षांच्या अथक पाठपुरावानंतर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाला राजमान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने डिजिटल इंडियाला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे, असे प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी केले.

महाराष्ट्रात डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात असून यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फेसबुक, इन्स्टा या सोशल मीडियासह युट्युब चैनल, वेब पोर्टलच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डिजिटल मीडियाला राज्य सरकारने विशेष अधिसूचना काढून राजमान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी भाऊसाहेब फास्के बोलत होते. 

प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळविण्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल राजा माने साहेब यांचा १३ जून रोजी कोल्हापुरात सत्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी आभार मानले. 

याप्रसंगी राज्य सचिव तेजस राऊत, राज्य कार्यकारी सदस्य रितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले, कोल्हापूर शहराध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सायली मराठे, कार्याध्यक्षा सौ. प्रीती कलढोणे, उपाध्यक्षा सौ. अंजुम मुल्ला, जिल्हा सचिव संगीता हुग्गे, जिल्हा संपर्कप्रमुख राजा मकोटे, सहसचिव इंद्रजीत मराठे, महिला आघाडी कोल्हापूर शहराध्यक्ष अमृता पवार, प्रशांत चुयेकर, रामनाथ डेंगळे, भुदरगड तालुका महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी साळुंखे, अविनाश इंगवले, सागर जमणे, गौतम दिवाण, प्रकाश पाटील, भुदरगड तालुकाध्यक्ष राजेंद्र दबडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू म्हेत्रे, तालुका सचिव संभाजी चौगुले आदीं सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here