शाहुवाडी : प्रतिनिधी
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीत असणाऱ्या धोकादायक वळणावरील रखडलेल्या पुलाच्या कामाची चौकशी व्हावी आणि रस्त्यावर करण्यात आलेला गतिरोधक काढण्यात यावा यासाठी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शाहुवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडीत आसणाऱ्या धोकादायक वळणावर अनेक अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये बऱ्याच प्रवाशांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर बऱ्याच प्रवाशांना अपंगत्व आले आहे. खिंडीत आसणाऱ्या अरुंद पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून लाखो रुपये मंजूर झाले आहेत मात्र या पुलाचे बांधकाम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही.
अरुंद पुलाच्या बांधकामासाठी ठेकेदाराने साहित्य देखील आणून ठेवले होते मात्र ते साहित्य झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पुलावर सातत्याने अपघात घडू लागल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर भले मोठे गतिरोधक केले आहेत. या गतिरोधकामुळे अनेक दुचाकी धारकांचे अपघात होवून गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत . त्यामुळे गतिरोधक काढण्यात यावेत आणि मंजुर होवून देखील पुलाचे बांधकाम का झाले नाही, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने अंदोलना दरम्यान करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी , तालुका प्रमुख दत्ता पवार, उपतालुका प्रमुख निवास कदम, सरपंच आनंद भोसले ,सचिन मुडशिंगकर, वाहतूक सेना प्रमुख कृष्णात दिंडे, प्रविण पाटील, नारायण सुतार, पांडूरंग रवंदे, लाळेमामा आदी शिवसैनिक उपस्थित होते. अंदोलन ठिकाणी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
————————————————————————————————-



