कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. विशेषत: गरीब व मध्यम वर्गाला घराचे फार अप्रूप असते. त्याच्या कमाईतून रोजचा खर्च भागविणे मोठे जिकीरीचे असते. सध्या तर वाढत्या महागाईमुळे घर घेणे अशक्य झाले आहे. सामन्यजनाला घराची फार आवश्यकता असूनही त्याला घर खरेदी करने सहजशक्य होत नाही. घराची मोठी रक्कम, व्याज, कर्ज फेडण्यासाठी लागणारा दीर्घ काल व कागदपत्रांची पूर्तता करताना होणारी दमछाक यामुळे सामान्यनास घर खरेदी करणे स्वप्नच वाटते. मात्र आता घर खरेदी करणे सोपे होणार आहे. रिझर्व्ह बँकेने एक धोरण आखले आहे.
घरासाठी मोठी रक्कम लागते. ही रक्कम फेडण्यासाठी व्याजाचे हप्ते भरावे लागतात. व्याजदरच कमी केला तर घर घेणे सोपे होईल. आरबीआय पुन्हा एकदा व्याज दरामध्ये कपात करण्यास अनुकूल असल्याचं म्हटलं जात आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एका अहवालात नमूद केल्यानुसार डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीदरम्यान व्याज दरामध्ये २५ बेसिस पॉईंटची आणखी कपात केली जाऊ शकते. यासोबतच या वर्ष अखेरीस व्याज दर ५.२५ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई दरात झालेली घट पाहता पुढील दोन पतधोरण बैठकांमध्ये मात्र आरबीआय व्याज दर स्थिर ठेवण्याचेच संकेत मिळत आहेत. घर कर्जाबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकांमध्ये आरबीआयकडून व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. डिसेंबरच्या बैठकित मात्र कर्जदारांना दिलासा देत व्याज दारात २५ बेसिस पॉईंटनं कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे.
याबाबतच्या अधिकृत आकडेवारीनुसार जून महिन्यात पभोक्ता मूल्य सूचकांक आधारित मुद्रानिती दर मे महिन्याच्या तुलनेत २.८ टक्क्यांनी कमी होऊन २.१ वर पोहोचलाआहे. रोजच्या आहारातील वस्तूमध्ये झालेली घट महागाई दर घटवण्यास कारणीभूत ठरली आहे. शिवाय यामध्ये आणखी घट होईल असं सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ रिझर्व बँक व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे.