कुरुंदवाड: प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या २०२५-३० पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी नव्याने जाहीर केले. यामध्ये ५२ ग्रामपंचायतीपैकी २६ महिला, २६ पुरुष असे आरक्षण जाहीर झाले. यात सर्वसाधारण १३, सर्वसाधारण (महिला) १३, अनुसूचित जाती ५, अनुसूचित जाती (महिला) ५ व नागरिकांचा मागास प्रवर्ग ७, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ७, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती (महिला) १ असे आरक्षित झाले आहे. काही गावात बदल झाल्याने नागरिकांत कही खुशी, कही गम असे वातावरण पहायला मिळते.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शिरोळ तालुक्यातील सन २०२५-३० या कालावधीसाठी ग्रामपंचायत निहाय सरपंचपदाचे नव्याने सोडत प्रक्रिया सोमवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. प्रथम तहसीलदार हेळकर यांनी गावनिहाय मतदान व आरक्षणाची प्रक्रिया याची माहिती डिजिटल स्क्रीनद्वारे दिली.
प्रारंभी अनुसूचित जातीची आरक्षण सोडत झाले. यामध्ये १९९५ पासून आजअखेर अनुसूचित जातीसाठी अर्जुनवाड, टाकवडे, शिरटी, अकिवाट, शिवनाकवाडीला आरक्षण आहे ते तसेच राहिले आहे. अनुसूचित जाती -महिलासाठी उदगाव, अब्दुललाट, राजापूरवाडी, बुबनाळ, लाटवाडी हे गाव आरक्षित झाले. अनुसूचित जमातीसाठी १९९५ पासून आरक्षण न पडलेलं आगर, टाकळीवाडी या २ गावापैकी अनुसूचित जमाती-महिलासाठी टाकळीवाडी हे गाव चिठ्ठीद्वारे काढण्यात आला आहे. तर अनुसूचित जमातीसाठी आगर आरक्षित झाले. त्यानंतर नागरिकांचे मागास प्रवर्ग आरक्षणात उमळवाड, जैनापुर, हेरवाड, राजापूर, खिद्रापूर, तेरवाड, संभाजीपूर तर नागरिकांचे मागास प्रवर्ग (महिला) यड्राव, औरवाड, बस्तवाड, आलास, दत्तवाड, नवे दानवाड, घालवाड हे आरक्षण पडले आहे. खुला सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) मध्ये कवठेसार, कोथळी, तमदलगे, कोंडिग्रे, नांदणी, हरोली, जांभळी, कनवाड, शिरढोण, शिरदवाड, गणेशवाडी, शेडशाळ, चिंचवाड तर सर्वसाधारणमध्ये दानोळी, निमशिरगाव, चिपरी, धरणगुत्ती, कुटवाड, हसुर, नृसिंहवाडी, कवठेगुलंद, गौरवाड, मजरेवाडी, घोसरवाड, टाकळी, जुने दानवाड हे आरक्षण जाहीर झाले आहेत.
यावेळी काहीज शंका उपस्थित केल्या. मात्र त्याचे निरसन तहसीलदार हेळकर यांनी केले. पूर्वीच्या आरक्षण व नव्याने जाहीर झालेला आरक्षणमध्ये काही ठिकाणी बदल झाल्याने काही नागरिकात नाराजी तर काही ठिकाणी आनंदाचे वातावरण होते.
————————————————————————————————-