गेल्या काही दिवसांपासून महागाईने डोकं वर काढल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रस्त असल्याचे पाहायला मिळालं होतं. गेल्या दहा वर्षांत गॅस सिलिंडरच्या किंमती दुप्पट झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक वापरातील एलपीजी गॅसच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना आता हॉटेलिंगचा आनंद घेता येणार आहे. सलग दुसर्यांदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. १ एप्रिल रोजी दिल्लीत सिलिंडरची किंमत ४१ रुपयांनी स्वस्त झाली.






