कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना होणाऱ्या नुकसानीचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी फळपीक विमा योजना – मृग बहार २०२५ सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानाच्या सततच्या लहरीपणामुळे फळपिके करपली, गळून पडली, तर कधी वादळवाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला! शेतकऱ्यांचं कंबरडं मोडत असताना सरकारनं यंदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी फळपीक विमा योजना – मृग बहार २०२५ सुरू केली आहे. आता या योजनेसाठी अर्ज भरायची लगबग सुरू झाली आहे.
कोणत्या पिकासाठी कधीपर्यंत अर्ज करायचा ?
-
मोसंबी, चिकू – ३० जून २०२५
-
डाळिंब – १४ जुलै २०२५
-
सीताफळ – ३१ जुलै २०२५
हवामानाचं थैमान थोपवणारी योजना
कधी कमी पाऊस, तर कधी अतिवृष्टी; कधी अवकाळी पाऊस, तर कधी ढगफुटी अशा हवामानाच्या तडाख्यात शेतकऱ्यांचं फळपिक अक्षरशः उध्वस्त होतं. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत भरपाई मिळणार आहे. विमा संरक्षणामुळे नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे.
अर्ज कसा करायचा ?
www.pmfby.gov.in (NCIP पोर्टल) या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना जमिनीचे कागदपत्र, पिकाचा पुरावा, बँक खाते, आधार वगैरे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्ज करताना एखादी चूक झाली, तर विमा मिळण्यात अडचण येऊ शकते, याची काळजी घ्या.
अर्जाच्या तारखा लवकरच येऊन ठेपणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशीर न करता आपल्या जवळच्या सेवा केंद्राकडे जाऊन अर्ज भरून घ्यावा, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. हवामानाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना हा विमा योजनाच मोठा आधार ठरणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी काही कागदपत्रं अनिवार्य आहेत. अर्ज करताना पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचं आहे :
-
Agristack नोंदणी क्रमांक (Agri ID)
-
आधार कार्ड
-
बँक पासबुक (कोणत्याही राष्ट्रीयकृत/खाजगी बँकेचे)
-
जमीनधारणा उतारा (७/१२ उतारा)
-
Geo-tag केलेले फोटो (पिकासहित शेताचे फोटो)
-
ई-पिक पाहणी नोंदणी
ई-पिक पाहणी नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. विमा योजनेत अर्ज केल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात ई-पिक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा, तुमचा विमा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
जर अर्ज करताना काही अडचणी आल्या तर शेतकऱ्यांनी तात्काळ पुढील ठिकाणी संपर्क साधावा:
-
तालुका कृषी अधिकारी कार्यालय
-
संबंधित विमा कंपनीचे कार्यालय
-
महसूल विभाग
कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर व योग्यरीत्या अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून हवामान बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळू शकेल.
—————————————————————————————–