कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कृषी विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश पात्रता शिथिल करण्यात आली आहे. आता ४५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकेल, याआधी ही अट ५० टक्के होती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) हा निर्णय घेतला आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या अभ्यासक्रमाचा लाभ सर्वसामान्य विद्यर्थ्याना व्हावा याचबरोबर भारताचा प्रमुख व्यवसाय असलेल्या शेती क्षेत्राचे ज्ञान व्हावे यासाठी प्रवेश पात्रतेत शितीलता आणली आहे.
अन्न उत्पादनाचे महत्त्व, आर्थिक विकास, पर्यावरण संरक्षण-शाश्वत शेती पद्धती, पशुपालन; मत्स्यपालन या पूरक व्यवसायामुळे अधिकच्या रोजगार संधी, नवीन तंत्रज्ञाणाच्या वापरामुळे किफायतशीर शेती, शेतीतील प्रगतीतून ग्रामीण विकास, योग्य पोषण आणि सुरक्षित अन्न -धान्य उत्पादन या दृष्टीने कृषी अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.
———————————————————————————————






