कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात दहा दिवसापासून हळू हळू पाऊस वाढत आहे. असाच पाऊस शनिवार पर्यंत म्हणजे अमावस्यापर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणेसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण घाटमाथा या भागांसाठी पुढील ४८ तासांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात जवळपास गेल्या चार ते पाच दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतली नसून, कैक दिवसांपारून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्यकिरणांनीही दर्शन दिलेलं नाही. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरासह विदर्भातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्याच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कणकवली-आचरा राज्य महामार्गावरील वरवडे येथे गड नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे मालवणकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून, या पावसाळ्यात पाचव्यांदा हा महामार्ग बंद झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काळातही पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.
सीना नदी माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातून ही नदी वाहते. मात्र मागील आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी प्रवाहित झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीपिकांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.
———————————————————————————————-



