पशुसंवर्धन विभागात भरती होणार ; अर्ज मागविले

0
400
Dairy farm, simmental cattle, feeding cows on farm
Google search engine

 

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी २० जून २०२५ पर्यंत अर्ज मागवले आहेत.

विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन विभागातील आवश्यक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले. त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले आहे. या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पाठपुरावा केला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here