कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) विविध पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्यासाठी फक्त तीन दिवस बाकी उरले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २५ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण १४६ पदांची भरती केली जाणार आहे.
एकूण 146 पदे भरण्यात येणार
या मोहिमेद्वारे एकूण १४६ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सिनियर रिलेशनशिप मॅनेजरची १०१ पदे, टेरिटरी हेडची १७ पदे, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा) १८ पदे, प्रायव्हेट बँकर- रेडियंस प्रायव्हेटची ३ पदे, ग्रुप हेडची ४ पदे, डेप्युटी डिफेन्स बँकिंग ॲडव्हायझरची १ पदे (डीडीबीए पोर्टफोल प्रॉडक्ट ऑफ बँकिंग ॲडव्हायझर) १ पदे, प्रिव्हेट बँकेचे १ पदे. संशोधन विश्लेषक भरले जातील.
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किती शुल्क?
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.in वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील “करिअर” टॅबवर जा आणि “सध्याच्या संधी” वर क्लिक करा. संबंधित लिंकवर क्लिक करा. अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या. उमेदवारांनी या भरतीसाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत. शेवटची तारीख संपल्यानंतर त्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.दरम्यान, तुम्ही जर बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असला तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.
—————————————————————————————-



