प्रसारमाध्यम डेस्क
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यावर्षीच्या निकालात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. २०२४ ची तुलनेत यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये १.७१ इतकी घाट झाल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी ८६ हजार ६४१ एवढे विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांनां फेरपरीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी १५ मे पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २४ जून ते १ जुलै पर्यंत ही फेरपरीक्षा होणार असल्याचे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
बोर्ड mahahsscborad.in या वेबसाईटवर लवकरच वेळापत्रक जाहीर करेल. फेरपरीक्षेला बसणारे विद्यार्थी mahahsscborad.in या वेबसाईटवर अर्ज नोंदणी करू शकतात.