आरबीआयचे अल्पवयीन मुलांसाठी हे आहेत नियम

0
154
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी बँकिंग सुविधा सुलभ करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) वेळोवेळी आपल्या नियमांमध्ये सुधारणा करत असते. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे अलीकडेच बँकेच्या काही नियमांत लक्षणीय बदल केले आहेत. मुलांमध्ये आर्थिक जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अल्पवयीन मुलांसाठी नवीन बँक खाते नियम 2025 जारी केले आहेत.

दहा वर्षे किंवा त्याहून मोठ्या मुलांसाठी रिझर्व बँकेचे नवीन नियम

रिझर्व्ह बँकेने बँकांना मोठे आणि महत्त्वाचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे आता 10 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची मुले त्यांचे बचत खाते आणि मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) उघडू शकतील आणि त्यांच्या पालक किंवा कोणत्याही काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या मदतीशिवाय स्वतः चालवू शकतील. याआधी मुलांना असे कोणतेही खाते उघडण्यासाठी त्यांच्या पालक किंवा कायदेशीर गार्डियनची आवश्यकता पडायची पण, आता वयाच्या 10 वर्षांनंतर मुलं काम आपले बँक अकाउंट हाताळू शकतील.
US Stock Market: सगळं सुरळीत सुरु असताना वाढलं टेन्शन..! ट्रम्पच्या एका वक्तव्यानं बाजारात खळबळ, डॉलर होतोय दुबळा
सोमवारी सर्व व्यावसायिक आणि सहकारी बँकांना एक परिपत्रक जारी करून आरबीआयने ही माहिती दिली. त्यात असे म्हटले आहे की कोणत्याही वयाचे मूल पालक किंवा गार्डियनमार्फत खाते उघडू शकते पण, जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर स्वतः बँक खाते सुरु करू शकतो आणि आपल्या आईला गार्डियन बनवू शकतो. आरबीआयचे नवीन नियम 1 जुलै 2025 पासून लागू होतील. अशा स्थितीत, मुलांसाठी बँक खात्यांचे नवीन नियम काय आहेत, ही खाती कशी उघडायची, अटी आणि शर्ती काय आहेत यासारखी सर्व माहिती जाणून घेऊ

10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, 10 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे अल्पवयीन मुले स्वतंत्रपणे त्यांचे बचत किंवा मुदत ठेव खाते उघडू आणि चालवू शकतात.

10 वर्षाखालील मुलांसाठी नियम
या मुलांसाठी बँक खात्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसून त्यांचे बँक खाते त्यांच्या पालकांसह किंवा पालकांसह संयुक्तपणे उघडले जाईल.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here