‘राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान सोहळा व 151 वा जयंती उत्सव व्याख्यानमाला शनिवार पासून

0
171
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शनिवार, दि. २१ जून ते बुधवार दि. २५ जून पर्यंत राजर्षी शाहू व्याख्यानमाला तसेच दि. २६ जून रोजी ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यतेखाली प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी केले आहे.

गुरुवार, दि. २५ जून २०२५ रोजी सकाळी आठ वाजता राजर्षी शाहू जन्मस्थळास भेट व राजर्षी शाहू प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण कार्यक्रम. सकाळी ८.३० वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू पुरस्कार-२०२५ प्रदान समारंभ होणार आहे.

१५१ वा राजर्षी शाहू जयंती उत्सव २०२५ व्याख्यानमाला

  • शनिवार, दि. २१ जून २०२५ – भारतीय संविधनाची निर्मिती प्रक्रिया आणि स्वरुप या विषयावर डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भालबा विभूते, कोल्हापूर यांचे व्याख्यान.
  • रविवार, दि. २२ जून २०२५ – भारतीय संविधान-मूलभूत अधिकार व कर्तव्ये या विषयावर डॉ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. श्रीरंजन आवटे, पुणे यांचे व्याख्यान.
  • सोमवार, दि. २३ जून २०२५ – भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय विषयावर डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राहूल कोसंबी, औरंगाबाद यांचे व्याख्यान.
  • मंगळवार, दि. २४ जून २०२५ – भारतीय संविधान व संसदीय लोकशाही विषयावर डॉ. प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.श्रीराम पवार, कोल्हापूर यांचे व्याख्यान.
  • बुधवार, दि. २५ जून २०२५ – भारतीय संविधान व न्यायव्यवस्था विषयावर डॉ. वसंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. प्रताप साळुंखे, मुंबई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सर्व व्याख्यानमाला दिनांक २१ जून ते २५ जून २०२५ या कालावधीत सायं. ६ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

————————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here