राजा शिवाजी चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

0
132
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

गेल्या काही महिन्यांपासून रितेश देशमुख यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा सुरू होती. आता या सिनेमाचा पहिला लुक समोर आला आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच शेअर करण्यात आले आहे.

राजा शिवाजी‘ हा चित्रपट महाराष्ट्राच्या अभिमानाचा, नाट्यमय कथेचा आणि उत्कृष्ट निर्मितीचा संगम ठरणार आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत, तर आपल्या संगीताने भारतीय चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबई आणि वाई इथ सुरू आहे.

केव्हा प्रदर्शित होणार सिनेमा?
भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषा आणि त्याचबरोबर जगभरात देखील प्रदर्शित होईल, आणि याच निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अतुलनीय शौर्यगाथा भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता रितेश विलासराव देशमुख म्हणाले  की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत, तर ते महाराष्ट्राच्याच नाही तर कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात जिवंत असलेली भावना आहे. या अलौकिक व्यक्तिमत्वाची महागाथा मोठ्या पडद्यावर साकारणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. मला खात्री आहे की, ही प्रेरणादायी कथा प्रत्येक भारतीयाच्या मनावर तितकीच खोलवर जोडली जाईल, जितके आम्ही जोडले गेलो आहोत.”

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here