प्रसारमाध्यम डेस्क
पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याकडून राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर राज ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिलं टि्वट केलेलं. ज्यांनी हल्ला केला आहे, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही” असे ते म्हणाले
पाकिस्तानातील एअर स्ट्राइकनंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी अतिरेकी ठार मारले. दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायचीय. आता मॉक ड्रील करायचं, सायरन वाजवायचे. मूळात ही गोष्ट का घडली ? याचा अंतमूर्ख होऊन आपण विचार करणं गरजेच आहे. मुळात पाकिस्तान हा आधीच बरबाद झालेला देश आहे.
ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे जातात तिथे सुरक्षा का नव्हती ?. मॉकड्रीलपेक्षा पण कोम्बिंग ऑपरेशन करणं जास्त गरजेच आहे. एअर स्ट्राइक करुन लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवण यावर युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही” असं ते म्हणाले.
ज्यावेळी हे सर्व झालं, त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियात होते. तो दौरा सोडून ते आले. बिहारला प्रचारासाठी गेले, ती गोष्ट करायची गरज नव्हती. केरळला अदानींच्या पोर्टच्या उद्घाटनासाठी गेले. मुंबईत वेव्हच्या समीटला आले. इतकी गंभीर परिस्थिती होती, तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा, जे दहशतवादी आहेत, त्यांना हुडकून काढा” असं राज ठाकरे म्हणाले. ‘आज नाक्या- नाक्यावर ड्रग्स मिळतायत, त्याच्या खोलात जाण्याची गरज असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
———————————————————————————






