दशरथ खुटाळे : शाहुवाडी प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांमध्ये पेरणी केलेले भात व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हताश झाले आहेत. शासनाची मदत मिळणार का ? या आशेवर बसण्याऐवजी पाऊस उघडीप देणार का, याच आशेवर अगतिक झालेला शाहुवाडीचा शेतकरी आस लावून बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुका हा निसर्गसंपन्न, डोंगराळ आणि पावसाळी प्रदेश आहे. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला हा तालुका कृषी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे पावसाचे भरपूर प्रमाण असल्यामुळे इथली शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असणारी खरीप शेती आहे. तसेच, काही भागांमध्ये सिंचनाची साधने उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामातही शेती केली जाते. महाराष्ट्रात जून महिन्याच्या अखेरीस व नियमितपणे जुलै महिन्यात येणाऱ्या मान्सून पावसावर संपूर्ण शेतीव्यवस्था अवलंबून असते. मात्र, यावर्षी मे महिन्यातच अनियमित, अचानक आणि अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडल्याने अनेक भागांत शेतीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवले.
शाहुवाडी तालुक्यात हा आठवडा सतत मुसळधार पावसाने गेला आहे, ज्यामुळे भूमी आणि पाण्याच्या साठ्यात सुधारणा झाली आहे. मात्र, पिकाच्या आरोग्याचे आणि भविष्यकालीन योजनांचे व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले आहे. शाहुवाडी तालुक्यात मे मध्ये मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले तर गेल्या २० दिवसांपासून मान्सूनने पुन्हा तळ ठोकल्यांने कशी बशी उरकलेली पेरणी ही वाया जात असून शेतकरी पिका विना पडीक शेती पाहून कासावीस झाला आहे. शेतात पाणी साठ्यामुळे पिकांचं उत्पादन, गुणवत्ता, आणि शेतकऱ्याचं आर्थिक आरोग्य यावर मोठा परिणाम होत आहे.
चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने भात, भुईमुग, सोयाबीन, रताळी या पिकांची लागवड केली गेली होती. पण अधीच शेतात ओल अधिक आहे आणि त्यात पावसाने गेल्या २० दिवसा पासून तळ ठोकल्यांचे सोयाबीन, भुईमूग बियाणे या पिकांचा चिखल होत आहे तर भात पिकाची ही वाढ खुंटली आहे. या वन्य प्राण्यांचा उपद्रव वेगळाच.
गेल्या काही काळात अनेक शेतकरी पावसाच्या धोका वाढल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली, जमिनीत पाणी साचल्यामुळे मुळं कुजली, खत-बियाणे वाया गेले. अशा वेळी शेतकऱ्याला त्यांच्या मेहनतीचे फळ न मिळाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण हा त्रासच असतो. शेतकऱ्याच्या या विदारक परिस्थितीवर मदतीची फुंकर मारणारे मात्र चांदीच्या ताटात जेवणाचा आनंद घेत बसले आहेत.
शेतीवर पावसाचा संभाव्य परिणाम :
- भात, मसूर व भाज्यांच्या पिकांसाठी फायदा : सततचा पावसाळा पीक-पर्जन्य जलप्रवाह राखतो; भातशेतीसाठी हे परिस्थिती अनुकूल राहील.
- पेरणीकार्याचा योग्य कालावधी : नुकसानीची काळजी करण्याऐवजी, पिकांच्या पेरणी, रोपण व खते/औषधांचा वेळ योग्य नियोजन करता येईल.
- वादळी वाऱ्यामुळे धान्य व माळाच्या नुकसानाची शक्यता : सुरुवातीच्या वाऱ्यांनी काही वेळा रोपांना नुकसान पोहोचू शकतात विशेषतः भाजीपाल्यावर.
- सिंचन व्यवस्था सुरु ठेवला पाहिजे : धरण‑विहिरीतील पाणी सतत राखून ठेवणे गरजेचे आहे; शाश्वत सिंचन व्यवस्था राबवण्याची गरज अधोरेखित होते.
शेतकरी व प्रशासनासाठी पुढील सूचना :
- पीक विमा व पंचनामे प्रक्रिया: पुरेशा पावसामुळे नुकसान होत नसल्याने, पंचनामांपेक्षा भविष्यातील अपघातांसाठी तयार राहायला सांगावे.
- हवामानाचा सतत विचार: पाणीनियोजनासाठी जलसाठा, नाले स्वच्छ करण्याच्या कामांवर तातडीने लक्ष द्यावे.
- शेतात यंत्रसामुग्रीची तपासणी: जर धुकेपण वाढलाय किंवा माती नम, यंत्रे साचलेली मिळत असतील तर त्यांच्या देखभालीची गरज आहे.
————————————————————————————————