तापमानासह पावसाळ्याचे दिवस वाढणार
सेंटर फॉर सायन्स टेक्नोलॉजी ॲण्ड पॉलिसी या संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या अभ्यासानंतर २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पाऊस व अति पावसाचे दिवस वाढणार असल्याचे पूर्वानुमान काढले आहे. याचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकासावर होणार असल्याने हा धोक्याचा इशारा असल्याची माहिती चोपणे यांनी दिली.संथ गतीने व नियमित काळात होणाऱ्या पावसासाठी तसेच तापमानवाढ रोखण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वीची स्थिती आणावी लागेल. त्यासाठी हरित पट्टे निर्माण करणे, प्रदूषण रोखणे, कार्बन डायऑक्साइडचे धोक्याच्या पातळीवरील प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. असेही प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.



