There is a possibility of heavy rain again in Konkan-Goa, Madhya Maharashtra, Marathwada and Vidarbha for the next six days.
पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा तडाखा अद्याप ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
३० सप्टेंबर –आज (सोमवार) राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नाही. फक्त नांदेड जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१ ऑक्टोबर – उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून
कोकण-मध्य महाराष्ट्र : रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट
विदर्भ : बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट
२ ऑक्टोबर
मराठवाडा : हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता, उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता.
कोकण-मध्य महाराष्ट्र : रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट.
३ ऑक्टोबर
विदर्भ : संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट.
मराठवाडा : बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा.
कोकण-मध्य महाराष्ट्र : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट.
राज्यातील इतर बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता.
हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने या पावसाचे सत्र सुरू राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून निचांकी भागातील लोकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.