कोल्हापुरात पाऊस वाढतोय

मुंबईसह राज्यात हलका ते जोरदार पाऊस

0
221
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापुरात काल रात्रीपासून सुरु असलेला पाऊस आज सकाळपर्यंत सतत चालू होता. सकाळी पावसाने काहीसा विराम घेतला असला तरी आकाशात ढगांची दाटी असून वातावरण दमट आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच, मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने शक्यतो घरातच राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून, नद्या-नाले भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुरातून वाट काढण्याच्या प्रयत्नात ग्रामसेवक चारचाकी वाहनासह वाहून गेला. प्रशासनाने त्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. प्राणहिता, गोदावरी नद्यांना पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने नदी काठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जनजीवन विस्कळीत झाले. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट दिला आहे.

आमच्या यू ट्यूब चॅनेललाही भेट द्या…👇

——————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here