कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात अचानक पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, ज्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला.तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पुढील काही तास हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सध्या तापमानाचा पारा चढलेला असून, प्रचंड उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, या उकाड्याला थोडासा दिलासा देणारी घटना शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात घडली. शहरात अचानक पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, ज्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे काही काळासाठी तरी नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला.
कोल्हापुरात सकाळी ८ च्या सुमारास आकाशात ढग दाटले आणि त्यानंतर काही भागांमध्ये हलकासा पाऊस झाला. जरी हा पाऊस काही मिनिटांचा होता, तरी त्यामुळे वातावरणात सकारात्मक बदल जाणवला.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस कोल्हापुरात हलक्याफुलक्या सरींची शक्यता असून, काही प्रमाणात गार वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाच्या या सरांनी उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा दिला आहे. नागरिकांनी मात्र हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज दुपारी २ वाजता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, कोल्हापूर जिल्ह्यात पुढील काही तास हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात याचा परिणाम जाणवू शकतो.
संभाव्य भाग :
-
करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड, पन्हाळा, हातकणंगले आणि इतर तालुक्यांतील काही गावांमध्ये
-
कोल्हापूर शहरासह परिसर देखील संभाव्य प्रभावाच्या झोनमध्ये
हवामान स्थिती :
-
वादळी वारे: ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यांची शक्यता
-
विजांच्या कडकडाटासह वादळ: विजा चमकण्यासह मेघगर्जना होणार
-
हलक्या पावसाच्या सरी: काही ठिकाणी हलकासा पाऊस पडेल
स्थानिक नागरिकांसाठी सूचना :
-
शेतकरी बांधवांनी तात्काळ उघड्यावर ठेवलेले पीक, साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे
-
मच्छीमार बांधवांनी नदीकाठ, धरणकाठ येथे जाऊ नये
-
पालकांनी लहान मुलांना घरातच ठेवावे, उघड्यावर न जाऊ देऊ नये
-
वाहनधारकांनी शक्यतो वाहनं थांबवून हवामान स्थिर होईपर्यंत वाट पाहावी
-
विजेच्या गडगडाटाच्या वेळी मोबाईल, लोखंडी वस्तू, उंच झाडं आणि टॉवरपासून दूर राहावे
संपर्क क्रमांक (स्थानीय आपत्कालीन सेवा) :
-
कोल्हापूर जिल्हा नियंत्रण कक्ष: १०७७
-
कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभाग: ०२३१-२६५०२५३
-
स्थानिक पोलीस ठाणे / ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा
-
नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घ्यावी व हवामान विभागाच्या पुढील सूचना ऐकत राहाव्यात. भारतीय हवामान विभाग, कोल्हापूर जिल्हा प्रशासन
———————————————————————————