कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
वाढत्या उकड्याने जीव हैराण झाला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून तापायला जे सुरु होते ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कमी होत नाही. दुपारी एक ते तीन वाजेपर्यत वाटते. पंख्याचा वाराही गरम येतो. तापमानही ३९-४० अंशा पर्यंत जाते. सध्या अशा परिस्थितीत दिलासा देणारे एक वृत्त आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार आहे. अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. यावल, चोपडा या तालुक्यात गारपीटसह जोरदार पाऊस कोसळलाय. पुण्यातील जुन्नरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर नाशिक जिल्ह्यात अवकाळीने गहू, कांद्यासाह द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. तर दुसरीकडे कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही ४० अंशावरच आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झाली असून ही घट कायम आहे.
कोल्हापुराही उष्णतेचा पारा वाढला असून आजचे कोल्हापूरचे जास्तीत जास्त तापमान ३६ अंश सेल्सिअस होते. वास्तविक जोतिबाची यात्रा झाल्यानंतर पाऊस पडतो असा प्रघात आहे. दोनच दिवसांपूर्वी जोतिबाची यात्रा झाली आहे. सध्याकाळी वारे जरी वहात असले तरी दुपारी फार गदमदते. हवामान खात्याने मुबईत दोन दिवसात पाऊस पडण्याचा आंदज व्यक्त केला आहे. मुंबईतील पाऊस दक्षिण महाराष्ट्रातही सरकू शकतो.



