राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील पडळी येथे भोगावती नदीत आज संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन साहित्य व बोटिंगचा सराव चाचणी व प्रात्यक्षिक घेण्यात आले.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि राधानगरी धरण क्षेत्रातील पावसाचे वाढलेले प्रमाण आणि त्या अनुषंगाने संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण कसे करावे, या उद्देशाने आज राधानगरी येथील भोगावती नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रात्यक्षिके घेण्यात आली.
यावेळी राधानगरी च्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी राधानगरी प्रशासन सज्ज असून प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे सांगितले. प्रात्यक्षिके दरम्यान तहसीलदार अनिता देशमुख, महसूल सहाय्यक प्रितम हिंगमिरे, मनीष पाटील,सचिन पाटील,कोमल पाटील,जितेंद्र मरगळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान कृष्णात सोरटे, प्रितम केसरकर,शैलेश हांडे,शुभांगी घराळे, प्रणाली महेकर,साक्षी पाटील, प्रथमेश येरुडकर,आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले, साहिल कोळी, सुरज पाटील,प्रतीक कांबळे,सौरभ पाटील,सुशांत खामकर आदि उपस्थित होते.



