गेल्या पाच दिवसा पासून पावसाची तालुक्यात संतधार सुरु आसल्यामुळे शेतीच्या कामाना वेग आला आहे. राधानगरी धरण हेआज ५९.२१ % भरले आहे आज सकाळी अकरा वाजता राधानगरी धरणाच्या सेवाद्वारातून सुरु असलेला एक हजार क्यूसेस विसर्ग वाढवून १५०० क्यूसेस केला आहे तसेच BOT पॉवर हाऊस मधील विसर्ग वाढवून १६०० क्युसेस केला आहे. एकूण भोगावती नदीमध्ये विसर्ग ३१०० क्यूसेस सुरु आहे.नदी काठच्या लोकांना सर्तकतचेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.
————————————————-






