राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सलग पाऊस सुरु असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण ९९% टक्के भरले आहे.पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण आज मध्यरात्रीच किंवा उद्या सकाळ पर्यंत पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.



