राधानगरी : प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण ९६ टक्के भरले आहे.पावसाचा जोर वाढल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
काल दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात ५३ मिमी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणात ९६ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
राधानगरी धरण परिसरात जून महिन्यापासून ते २४ जुलै पर्यंत २९८१ मिमी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणातील वीज निर्मिती केंद्रातून १५०० क्युसेस विसर्ग भोगावती नदीपात्रात चालू असल्याने नदीपात्रात वाढ होत आहे.
———————————————————————————