प्रसारमाध्यम डेस्क
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या ब्रेल लिपीमधील पहिल्या शाहू चरित्र पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एक कार्यक्रमात विक्रम रेपे यांनी संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराज ब्रेल लिपि पुस्तिकेचे प्रकाशन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. ब्रेल लिपीत प्रकाशित होणारे हे पहिलेच शाहू चरित्र आहे.
यावेळी उपस्थित अंध विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते पुस्तिका प्रदान करण्यात आल्या. दृष्टिहीन आणि वंचित घटकांच्या ज्ञानसंवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे, असे मत यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी मांडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, पुरालेखागारचे अधिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके, मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकूमार मोरे, कुलसचिव डॉ. वसंत शिंदे डॉ. अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
—————————————————————————–



