शाहुवाडी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
शाहूवाडी तालुक्यातील परळी येथील सर्वे नंबर २२३ मधील प्रस्तावित बॉक्साइट खान कामासाठी पर्यावरण विषयक मल्हार मिनरल्स या कंपनीची लोकजन सुनावणी आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणिप्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उप प्राधिकरण अधिकारी किल्लेदार यांचे मार्गदर्शनाखाली आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तात पार पडली.
सर्वे नंबर २२३ मधील ७.५४ हेक्टर पैकी ७.१२ हेक्टर बॉक्साइट उत्खनन तर ०.४२ हेक्टर रस्त्यासाठी वापरत असणाऱ्या मल्हार मिनरल्स या प्रोजेक्टच्या लोक जन सुनावणीस या पंचक्रोशीतील चार ते पाच हजार रुपये लोकांसह सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष विविध संघटना पर्यावरण प्रेमी पर्यावरण अभ्यासक यांनी यामध्ये सहभाग घेतला. लेखी स्वरूपातही काही ग्रामपंचायती संस्था आणि इतर घटकांनी आपले म्हणणे मांडले. सहमतीच्या बाजूने असलेल्या बहुसंख्य लोकांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हात वर करून पाठिंबा दर्शवला तर काहींनी विरोध करून पर्यावरण आणि खनिज संपत्ती वाचली पाहिजे असे आपले मत यावेळी व्यक्त केले. आज झालेल्या लोकजन सुनावणीचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना संचालक युवराज पाटील म्हणाले, “पर्यावरणाची काळजी घेऊन हा नवउद्योग तालुक्यासह या पंचक्रोशीतील जनतेसाठी येत आहे. बेरोजगारासाठी यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल विरोधकांनी विकासाला विरोध करू नये आणि या प्रकल्पाला अडथळा ही निर्माण करू नये या पंचक्रोशीतील सर्व गावांनी या प्रकल्पासाठी संमती दर्शवली आहे, त्यामुळे हा प्रस्तावित प्रकल्प होणारच”.
यावेळी संचालक युवराज पाटील, सरपंच शुभांगी कांबळे, माजी सरपंच बाजीराव सावरे, जनसुराज्य युवा शक्तीचे अध्यक्ष ए वाय पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे ,भाजप सरचिटणीस संजय खोत, पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते तानाजी रवंदे,मानसिंग सावरे, जीवन सावरे आधी सह पंचक्रोशीतील नागरिक व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रशासनाकडून शाहुवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.