कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ही सूचना अजिबात दुर्लक्ष करू नका. सरकारनं एक नवीन ‘शेतकरी ओळखपत्र’ अनिवार्य केलंय आणि ते बनवण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. जर हे ओळखपत्र वेळेत बनवलं नाही, तर तुमच्या हक्काचा २० वा हप्ता थांबू शकतो. काय आहे हे ओळखपत्र आणि ते कुठे बनवायचं? जाणून घ्या लगेच!
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही शेतकर्यांच्या आर्थीक मदतीसाठीची योजना आहे ज्याच्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठवली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.
तुम्हीही प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते! कारण योजनेचा पुढचा हप्ता वेळेवर मिळणार की थांबणार, हे आता एका नव्या कागदपत्रावर अवलंबून असणार आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, ‘शेतकरी ओळखपत्र’ नसल्यास योजनेचा पुढील हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार नाही, अशी स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत १९ हप्त्यांचे पैसे मिळाले असले तरी २०वा हप्ता मिळवण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे.
‘शेतकरी ओळखपत्र’ म्हणजे नेमकं काय ?
हे ‘शेतकरी ओळखपत्र’ म्हणजे एक प्रकारचं डिजिटल आयडी कार्ड असणार आहे. यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील आणि इतर सरकारी योजनांशी संबंधित माहिती नोंदवली जाणार आहे. या ओळखपत्रामुळे भविष्यातील सर्व सरकारी मदतीचं वितरण अधिक सोपं आणि पारदर्शक होणार असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे.
हे ओळखपत्र मिळवण्यासाठी फार काही क्लिष्ट प्रक्रिया नाही. शेतकरी आपल्या गावातील कृषी विभागाच्या कार्यालयात, तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात किंवा जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात. तिथे आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून दिली जाईल.
शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर या तारखेपर्यंत ओळखपत्र तयार झालं नाही, तर पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अडकण्याची शक्यता आहे. याचबरोबर इतर सरकारी योजना आणि सवलती देखील थांबू शकतात.
सरकारच्या सूचनेनुसार, या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना भविष्यात सरकारी योजना मिळवणं अधिक सोयीचं आणि वेगवान होईल. यामुळे लाभार्थ्यांची थेट ओळख पटवली जाईल आणि अयोग्य लाभ घेणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर या शेतकरी ओळखपत्रासाठी आजच अर्ज करा. शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीनं ही प्रक्रिया पूर्ण करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे!