कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शेती हे अनिश्चित उत्पन्न असलेले काम. हवामानातील बदल, उत्पादनातील घट आणि वाढते वय यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वयाच्या साठीनंतर नियमित दरमहा पेन्शनच्या रुपात आर्थिक मदत मिळते.
निवृत्तीवेतन किती मिळते ?
या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹ ३,००० इतकी निवृत्ती वेतनाची रक्कम मिळते. म्हणजे वार्षिक ₹ ३६,००० थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. ही रक्कम औषधोपचार, घरगुती खर्च आणि इतर गरजांसाठी उपयोगी ठरते. त्यामुळे उतारवयात शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक आधार मिळतो.
हप्ता किती भरावा लागतो ?
शेतकऱ्यांच्या वयाच्या आधारावर दरमहा ₹ ५५ ते ₹ २०० पर्यंतचा हप्ता भरावा लागतो. जितक्या लवकर शेतकरी नोंदणी करतो, तितका त्याचा हप्ता कमी असतो. शेतकरी जेवढा योगदान देतो, तेवढीच रक्कम केंद्र सरकारही त्यात जमा करते. त्यामुळे एकत्रित निधी तयार होऊन निवृत्तीवेतनाचा लाभ मिळतो.
अर्ज करण्याची प्रक्रिया :
-
पात्रता : वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असणे आवश्यक, स्वतः शेती करणारा असावा.
-
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक, वयाचा दाखला / जन्मनोंदणी प्रमाणपत्र
-
अर्ज कुठे करावा : जवळच्या महा ई सेवा केंद्रावर जाऊन आधार क्रमांकावरून नोंदणी करावी.
-
ऑनलाईन पोर्टलवरूनही अर्ज सादर करता येतो.
-
नोंदणी झाल्यानंतर : दरमहा निश्चित हप्ता भरावा लागतो.
-
सरकारही तितकीच रक्कम योगदान म्हणून जमा करते.
-
वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹ ३,००० पेन्शन मिळते.