spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयशक्तिशाली उपग्रह NISAR चे आज प्रक्षेपण

शक्तिशाली उपग्रह NISAR चे आज प्रक्षेपण

पृथ्वी निरीक्षणासाठी भारत-अमेरिकेचा ऐतिहासिक टप्पा

श्रीहरिकोटा :  प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आज सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून निसार (NISAR – NASA-ISRO Synthetic Aperture Radar) उपग्रहाचे आज प्रक्षेपण होणार आहे. भारताची इस्रो आणि अमेरिकेची नासा यांचा हा संयुक्त उपक्रम असून, तो पृथ्वीच्या निरीक्षणासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.
निसार म्हणजे काय ?
निसार हा उच्च-तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला उपग्रह असून, नासा आणि इस्रो यांनी तो एकत्रितपणे तयार केला आहे. या उपग्रहाच्या निर्मितीसाठी सुमारे १.५ अब्ज डॉलर ( १२,५०० कोटी रुपये ) इतका खर्च झाला आहे. निसार उपग्रह ७४३ किमी उंचीवरील सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत स्थिर करण्यात आला आहे. या कक्षेत तो दर ९७ मिनिटांनी पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करणार असून, १२ दिवसांत १,१७३ प्रदक्षिणा घालून पृथ्वीच्या जवळ जवळ प्रत्येक इंचावर नजर ठेवणार आहे.
निसार मोहिमेची वैशिष्ट्ये
  • L-बँड ( नासा ) आणि S-बँड ( इस्रो ) रडार्सचा समावेश, त्यामुळे ते ढग, धूर, घनदाट जंगले आणि अंधारातही स्पष्ट निरीक्षण करू शकतो.
  • पृथ्वीवरील अगदी सूक्ष्म हालचाली देखील नोंदवू शकतो, जसे की जमीन खचणे, बर्फ वितळणे इ.
  • पारंपारिक उपग्रह ज्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत, त्या निसार पार करतो – तो सर्व ऋतूंमध्ये, दिवस किंवा रात्र, कोणत्याही हवामानात निरीक्षण करू शकतो.
  • डेटा पूर्णतः  ओपन-सोर्स स्वरूपात जगभरातील संशोधकांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
निसार मोहिमेची मुख्य उद्दिष्टे
निसारचे उद्दिष्ट पृथ्वी व तिच्या पर्यावरणातील बदलांचे बारकाईने निरीक्षण करणे आहे. मोहिमेतील महत्त्वाचे लक्षक्षेत्र खालीलप्रमाणे
  1. जमीन आणि बर्फ बदल – उपग्रह हिमनद्यांची स्थिती, बर्फ वितळणे, किंवा भूस्तरातील बदल शोधून काढेल.
  2. जमिनीवरील परिसंस्था – जंगलांची झपाट्याने होणारी कमी, शेतीतील बदल यावर लक्ष ठेवेल.
  3. सागरी क्षेत्र – समुद्राच्या लाटा, पाण्याची पातळी, सागरी पर्यावरणाचे आरोग्य यावर देखरेख ठेवेल.
एक नवीन युग सुरू
निसारच्या माध्यमातून हवामान बदल, नैसर्गिक आपत्तींचा धोका, जमिनीच्या वापरातील बदल आणि बऱ्याच बाबींवर सखोल अभ्यास करता येणार आहे. हा उपग्रह भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरतो. पुढील पाच वर्षे हा उपग्रह पृथ्वीवर नजर ठेवणार असून, त्याच्या मदतीने मानवी जीवनावर प्रभाव करणाऱ्या बदलांचे वेळीच भान ठेवता येईल.
या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारत आणि अमेरिका दोघांनीही पृथ्वी निरीक्षणाच्या जागतिक मंचावर एक नवे पाऊल ठेवले जाणार आहे. निसार हे भविष्यातील निर्णयांसाठी वैज्ञानिकांचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

—————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments