चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
चंदगड – बेळगाव रस्त्यावर प्रत्येक वर्षी खड्डे पडण्याची परंपरा आहे ती या वर्षीही कायम राहिली आहे. मान्सूनपूर्व पावसातच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सध्या या रस्त्यावरून कोकणात आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावरून वाहनांची संख्या देखील वाढली आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.
पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने बरेच छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. त्याचबरोबर वाहनांचे नुकसान पण होत आहे. येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण वाढल्यास गंभीर घटना घडू शकतात म्हणून या परिसरातील नागरिक आणि प्रवासी या रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीची मागणी करत आहेत.