पीएम मुद्रा योजना ठरली वरदान, लाखो महिला झाल्या उद्योजक

0
161
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महिला लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक

या योजनेच्या माध्यमातून नवउद्यमींसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. वेगवेगळ्या लघु, सूक्ष्म उद्योगांसाठी हे कर्ज दिले जाते. उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी देशभरातील महिलांनी मोठ्या उत्साहात या योजनेचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारनेही महिलांना कोणत्याही तारणाशिवाय हे कर्ज दिलेले आहे.

योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळते कर्ज

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेत पुरुषांनाही कर्ज मिळते. मात्र आकड्यांचा अभ्यास करायचा झाल्यास या योजनेचा पुरुषांपेक्षा महिलांनीच जास्त फायदा घेतलेला आहे. महिलांकडे कोणत्याही स्वरुपाची संपत्ती नसली तरी या योजनेत महिलांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. ब्यूटी पार्लर, फूड स्टॉल, छोटी दुकाने, शूक्ष्म उद्योग अशा प्रकारचे उद्योग चालू करण्यासाठी मुद्रा योजनेतून सरकार महिलांना आर्थिक सहकार्य करते.

लाभार्थी महिलांची संख्या ६८ टक्के

केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी या योजनेबाबत अधिक माहिती दिली आहे. या योजनेत एकूण लाभार्थ्यांपैकी ६८ टक्के महिला आहेत. या योजनेच्या माध्यमातून ५२ कोटी लोकांना त्यांचे उद्योग चालू करण्यासाठी देशभरात एकूण ३३ लाख कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी कोणतेही तारण घेण्यात आलेले नाही. गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने ५२ कोटी लोकांनी ३३ लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप कोणतेही तारण न घेता केलेले आहे. कर्जाची ही रक्कम ५० हजार रुपयांपासून ते २० लाख रुपयांपर्यंत आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here