कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र सरकारने ठरवले आहे की एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी शेतकऱ्यांची पात्रता पडताळणी, ई-केवायसी (e-KYC), भू-संशोधन (land verification) यासारख्या प्रक्रियांना वेग देण्यात आला आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ६,००० रुपये थेट बँक खात्यावर तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २० हप्ते वितरित झाले आहेत. २१ व्या हप्त्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच रक्कम जमा होणार आहे. या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यानी अद्याप ई-केवायसी अपडेट केलेले नाही, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी. भूधारणा संबंधित दस्तऐवज शुद्ध असावेत, अन्यथा हप्ता अडू शकतो. खात्यातील माहिती (IFSC कोड, खात्याचा क्रमांक) अचूक आहे की नाही, याची खातरजमा करावी.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या हप्त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला होता. केंद्र सरकारने बँका आणि राज्य सरकारला यावेळी कडक ताकीद दिली आहे. आधार लिकिंग, KYC आणि चुकीची बँक माहिती सारख्या अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाही. पण यावेळी अशा चुका होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरुवात झाली. या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो. या योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला थेट ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. ही मदत तीन टप्प्यात देण्यात येते. २ हजार रुपयांप्रमाणे चार महिन्याच्या अंतरावर ही रक्कम जमा करण्यात येते. आता पर्यंत सरकारने २० हप्त्यांमध्ये जवळपास ३.९० लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.
केंद्र सरकारने सर्व बँका आणि राज्य सरकारला या योजनेविषयीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अनेक गावात या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यसाठी शिबीर सुरू करण्यात येणार आहे. बँक अधिकारी शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया, खात्यासंदर्भातील माहिती, आधार याविषयीची माहिती अपडेट करणार आहे.
———————————————————————————————






