नवी दिल्ली : प्रसारमाध्यम न्यूज
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २०व्या हप्त्याची शेतकरी वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे. जुलै महिना अर्ध्यावर आला असतानाही अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, आता सर्वांचे लक्ष १८ जुलै या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील मोतिहारी येथील दौऱ्याकडे लागले आहे.
मोठ्या घोषणांची शक्यता :
१८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोतिहारीमध्ये एका भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात ते अंदाजे ७१०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा करणार असून, यामध्ये रस्ते, महामार्ग, आयटी आणि रेल्वे संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. या माध्यमातून बिहारच्या विकासाला मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ :
या दौऱ्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सुमारे ४० हजार लाभार्थ्यांच्या खात्यात १६२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यासोबतच, काही लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर होणार? :
या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अशी शक्यता वर्तवली जात आहे की, पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची घोषणा देखील याच कार्यक्रमात होऊ शकते. याआधी अनेक वेळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या हप्त्यांची घोषणा सार्वजनिक कार्यक्रमांमधूनच केली आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रावर :
जर २० वा हप्ता १८ जुलै रोजी जाहीर झाला, तर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हप्त्याचा थेट लाभ पोहोचेल. त्यामुळे सध्या संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. अधिकृत घोषणा होताच खात्याची स्थिती तपासण्यासाठी पीएम किसान पोर्टल वर भेट देणे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का, हप्ता मिळणार की नाही हे तपासण्यासाठी खालील गोष्टी तपासा:
- https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
- ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.
——————————————————————————————-