कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखीन एक योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ वृद्ध शेतकऱ्याना होणार आहे. पीएम किसान मानधन योजना ही नवीन योजना आहे. ही एक अत्यंत फायदेशीर आणि सहज लाभ मिळवता येईल अशी पेन्शन योजना आहे. विशेष बाब म्हणजे, या योजनेत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून एकही पैसा भरावा लागणार नाही, तरीही सरकार शेतकऱ्याच्या भविष्याचा आधार घेऊन ६० वर्षा नंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.
जर शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असेल तर पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. केंद्र सरकारच शेतकऱ्यांच्या वतीने प्रीमियम भरते. शेतकऱ्याच्या खात्यात दरमहा निश्चित रक्कम येते. १८ ते ४० वयोगटातील शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. पेन्शनसाठी शेतकऱ्याला ६० वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत : लघु आणि सीमांत शेतकरी (ज्यांच्याकडे २ हेक्टरपर्यंत शेती आहे), वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असणारे शेतकरी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असल्यास आपोआप या योजनेत नावनोंदणी करता येते.
अर्ज करण्याची पद्धत: जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन नावनोंदणी करता येते.आधार कार्ड, शेतजमिनीचे कागदपत्रे आणि बँक पासबुक आवश्यक. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देणे आणि त्यांच्या जीवनशैलीत स्थैर्य निर्माण करणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
————————————————————————————



