प्लॉस्टिक निर्मूलन आणि प्लॉस्टिक पुनर्वापर कार्यशाळेअंतर्गत प्लॉस्टिक मुक्त भविष्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप

0
92
Google search engine

प्रसारमाध्यम l प्रतिनिधी

 महाराष्ट्र शासनाच्या ‘प्लॉस्टिक निर्मूलन आणि प्लॉस्टिक पुनर्वापर’ अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर आम्ही जांभळीकर फौंडेशन व टिम वर्ल्ड फॉर नेचर यांच्या संयुक्त विद्यमाने जांभळी येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हायस्कूल तसेच जांभळी विद्या मंदिर शाळा क्रमांक १, २ व ३ येथील विद्यार्थ्यांना ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि प्लॉस्टिक वापराचे दुष्परिणाम समजावून सांगत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वर्ल्ड फॉर नेचरचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभिजीत वाघमोडे, सौ. निर्मला मयूर बेदरे, दिग्विजय शिर्के, प्रियांशू मयूर बेदरे व उपस्थित होते.

सौ. निर्मला बेदरे यांनी विद्यार्थ्यांना प्लॉस्टिक पिशव्यांमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान समजावून सांगत कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित शिक्षकवृंदानी सुद्धा मानवी आरोग्यासह पर्यावरणाच्या आरोग्यावर प्लॉस्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणामाला आळा घालायचा असेल तर दैनंदिन वापरातील एकल प्लॉस्टिक वापर टाळू शकतो व तो टाळणे सहजशक्य आहे हे समजून घेतले व इथून पुढे प्लॉस्टिक चा वापर टाळण्याचा दृढनिश्चय केला.

यावेळी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कापडी पिशवी वापराच्या जनजागृतीसाठी प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार वाघ, शिक्षकवर्ग तसेच प्राथमिक शाळांचे शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर वर्ल्ड फॉर नेचरच्या टीमने जांभळीतील विविध दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कला भेट देऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची माहिती घेतली व “ऑक्सिजन पार्क” या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे नियोजन आम्ही जांभळीकर फौंडेशनचे गोविंद जाधव, बाळकृष्ण शिंदे, आकाश यादव, सलमान कुडचे, ऋषिकेश राऊत,अक्षय खोंद्रे आदींनी केले. स्वागत श्री शाम पाटील सर यांनी तर श्री मोहन कांबळे सर यांनी आभार व्यक्त केले.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here