कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शनिवारी (दि.९) रक्षाबंधन आहे आणि रविवार सुट्टीचा दिवस तसेच शुक्रवारी १५ ऑगस्ट. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस अशा जोडून आलेल्या सुट्ट्यां आल्या आहेत. मात्र जायचे कसे हा प्रश्न आहेच. अशावेळी होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी १८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि पुणे या महनगरामधून नागपूर, कोल्हापूर आणि गोवा या प्रमुख मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर: एकूण ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव: एकूण ४ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर: एकूण २ फेऱ्या, पुणे ते नागपूर: एकूण ६ फेऱ्या ठेवल्या आहेत.
मुंबई – गोवा : गाडी क्रमांक ११२५/११२६ आणि ११२७/११२८: या गाड्या दिनांक १४, १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान धावतील.थांबेः ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड.
डब्यांची रचनाः या गाड्यांमध्ये वातानुकूलित प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीसह शयनयान डबे असतील.
मुंबई – कोल्हापूर : गाडी क्रमांक १४१७/१४१८: ही गाडी दिनांक ८ ऑगस्ट रोजी मुंबईहून आणि १० ऑगस्ट रोजी कोल्हापूरहून सुटेल. थांबेः दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज.
डब्यांची रचनाः २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी.