spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयपीओकेतील लोक स्वतःच देशाच्या मुख्य प्रवाहात परततील : संरक्षण मंत्री राजनाथसिंह

पीओकेतील लोक स्वतःच देशाच्या मुख्य प्रवाहात परततील : संरक्षण मंत्री राजनाथसिंह

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

तो दिवस दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) लोक स्वतःहून भारतीय कुटुंबाचा भाग बनण्यासाठी स्वतःच देशाच्या मुख्य प्रवाहात परततील, असे भाकीत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी वर्तविले.

दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंह ठामपणे म्हणाले की, पीओके मधील लोक आपले आहेत. प्रेम, एकता आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या भारताकडे आपला स्वतःचा भाग असलेले पीओके स्वतःहून परत येईल आणि म्हणेल, मी भारत आहे, मी परत आलो आहे. आम्ही ‘एक भारत, महान भारत’ या संकल्पासाठी वचनबद्ध आहोत. ‘पीओके’मध्ये राहणाऱ्या बहुतेक लोकांना ठामपणे वाटते की त्यांचे भारताशी घनिष्ठ नाते आहे. फक्त काही लोक आहेत ज्यांना दिशाभूल करण्यात आली आहे. येथे राहणाऱ्या आपल्या भावांची स्थिती शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखीच आहे. भारत नेहमीच हृदये जोडण्याबद्दल बोलतो. पीओकेचे लोक आपलेच आहेत.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताच्या स्वदेशी लष्करी व्यवस्थांनी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. आमच्या राजनैतिक व्यासपीठांनी, सशस्त्र प्रणालींनी त्यांची ताकद दाखवली असे नमूद करताना राजनाथसिंह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही पाकिस्तानचे कितीतरी जास्त नुकसान करू शकलो असतो; परंतु आम्ही संयम बाळगला. आज पाकिस्तानला दहशतवादाचा धंदा चालवण्याची मोठी किंमत कळली आहे. आम्ही दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका पुन्हा तयार केली आहे आणि परिभाषित केली आहे. आम्ही पाकिस्तानशी आमच्या संबंधांची आणि संवादाची व्याप्ती पुन्हा परिभाषित केली आहे. आतापासून पुढे जेव्हा जेव्हा चर्चा होईल तेव्हा ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर बद्दल असेल. पाकिस्तानशी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, भारताची संरक्षण निर्यात आता २३हजार,५०० कोटी रुपयांच्या विक्रमी आकड्यापर्यंत पोहोचली आहे. आज आम्ही फक्त लढाऊ विमाने किंवा क्षेपणास्त्र प्रणालीची निर्मिती नव्हे तर आम्ही नवीन युगातील युद्ध तंत्रज्ञानाचीही तयारी करीत आहोत. भारताच्या सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी मेक इन -इंडिया इन डिफेन्स आवश्यक आहे, हेही आज सिद्ध झाले आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments