प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
सध्या चालू असलेल्या इराण आणि इस्राइल अमेरिका युद्ध हे जागतिक युद्धाच्या उंबरठ्या वर येऊन ठेपले असताना सगळे देश आपल्या सुरक्षितेसाठी सावध भूमिका घेण्याच्या पवित्र्यात असताना, पाकिस्तान मात्र रस्त्यावरची वरात घाल माझ्या घरात असे वागत आहे. इराणची राजधानी तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, जगात कुठेही त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धोका निर्माण झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरमच्या निवेदनात इस्रायलला उद्देशून ‘पाकिस्तानला कमी लेखू नये’ असा कडक संदेश देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील काही इमारतींना धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने थेट इस्रायलला दिलेल्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे आधीच तणावपूर्ण असलेली परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या युद्धात काहीही कारण नसताना पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. कच्चे तेल आणि गॅस नसल्याने लॉकडाऊनची स्थिती पाकिस्तानमध्ये असताना काड्या कारणाचे काम पाकिस्तान करत आहे.भीकेला लागण्याची वेळ असतानाही पाकिस्तानच्या अंगातील मस्ती काही जात नाहीये. हे अस आहे घर में नाही खानेको ज्वारी और बाहेर करते जमादारी. पाकिस्तानच्या जनतेचे खायचे वांदे असताना थेट इस्त्रायलसोबत पंगा घेताना पाकिस्तान दिसत आहे.
दरम्यान, भारतने या संघर्षात मध्यस्थीची भूमिका घेत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. भारताकडून युद्ध टाळण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या संपूर्ण घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत इस्रायलकडून येणाऱ्या प्रतिक्रियेकडे जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.






