प्रसारमाध्यम डेस्क
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ हे नाव आवर्जून घेतले जाते. पुण्यातील कडवट वास्तव मांडणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. त्यातीलच एक लक्षवेधी आणि छोटेखानी पण ठसठशीत भूमिका म्हणजे ‘चहावाली’. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मालविका गायकवाड. अलीकडेच मालविकानं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथून पदवी पूर्ण केली असून, ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
“आज पातूर मार खाणारेच बगीतले.. मारणारा पहिल्यांदाच बगीतला” या संवादातील मालविकाची आदा बघून लई पोरं नुस्ती खुळी झालती.. ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये मालविकानं साकारलेली चहावालीची भूमिका फार मोठी नव्हती, मात्र तिच्या सहज अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात भरली. हा मालविकाचा पहिलाच आणि शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला आणि सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्न झालं आणि ती पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाली.
२०२५ मध्ये मालविकाने इंग्लंडमधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीधर प्रशिक्षण पूर्ण केले. ऑक्सफर्डमध्ये “Do fidem” शपथ घेत तिने तिचं पदवीधरत्व घोषित केलं. तिचा ऑफिशियल ऑक्सफर्ड प्रोफाईल Saïd Business School मध्येही तिचा उल्लेख आहे, जिथे तिने व्यवसाय अभ्यासक्रम केला आहे
तुम्हाला आश्चर्य वाटेल .. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाचा गाडा चालवणारी मालविका ही बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची राजकन्या आहे. बसला की नाही धक्का? एवढंच नाही तर ती एक उच्च शिक्षित सुद्धा आहे. तीने पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचदरम्यान ‘मुळशी पॅटर्न’च्या ऑडिशनसाठी निवड झाली होती.
मालविका ही अत्यंत नम्र, मनमिळावू आणि मेहनती गायिका आहे. तिच्या यशामागे तिची निष्ठा, सातत्य आणि पारंपरिक संगीताचे मजबूत बॅकग्राऊंड आहे. ती संगीताला फक्त करियर म्हणून नव्हे, तर एक साधना मानते. मालविकाने केवळ अभिनय आणि शिक्षणातच नव्हे, तर व्यवसाय क्षेत्रातही तिने यश मिळवलं आहे. सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता वाढावी म्हणून तिनं ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावानं कंपनी सुरू केली आणि ‘हंपी A2’ या ब्रँड अंतर्गत सेंद्रिय दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरु केली.
मालविका गायकवाड ही केवळ ‘मुळशी पॅटर्न’च्या यशामागची गायिका नाही, तर मराठी संगीतविश्वात एक उगवता तारा आहे. तिने आपल्या सुरेल आवाजातून संगीताच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात तिच्या गायकीतून अजून कितीतरी सुंदर गाणी आणि अनुभव रसिकांना ऐकायला मिळणार, याची खात्री आहे.
“मुळशी पॅटर्न” मधील कामगिरीनंतर तिला विविध मंचांवरून गौरवण्यात आलं. तिच्या आवाजातील नैसर्गिक माधुर्य, स्पष्ट उच्चार आणि गाण्यातली सच्चाई यामुळे ती अल्पावधीतच सर्वांच्या लक्षात राहिली.






