कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर वेळापत्रक देण्यात आले आहे. वेळापत्रानुसार योजनेसाठी पात्र असणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नमूद कालावधीत https://hmas.mahait.org शासनाच्या या संकेतस्थळावर अर्ज भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
सन २०२५-२६ साठी वसतीगृह, पंडीत दिनदयाळ स्वंयम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार यासाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
१२ वी नंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी – १ ते १८ सप्टेंबर, अर्ज छाननी करावयाचा कालावधी- १९ ते २४ सप्टेंबर, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे- २५ सप्टेंबर, पहिली निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत-६, रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करणे- दिनांक ९ ऑक्टोबर व दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत- १७ ऑक्टोबर याप्रमाणे आहे.
शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण (तिसरा मजला) कोल्हापूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ,कोल्हापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक श्रीमती नेर्लीकर यांनी केले आहे.