कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण योजना अनेकांना नवजीवन देणारी आहे. या योजनेमुळे कित्येकांचे जीवन फुलले आहे. म्हणूनच अवयव दान श्रेष्ठ दान मानले जाते. अवयव दान जिवंतपणी किवा मरण पावल्यावर करता येते. जिवंतपणी एखादे अवयव जसे की मूत्रपिंड किंवा ऊती (tissue) याचे दान करता येते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर अवयव दान करता येते.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा मेंदू मृत झाल्यावर तिचे अवयव जसे की मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुफ्फुस, डोळे, स्वादुपिंड, त्वचा दुसऱ्या व्यक्तीला दान करता येते. आज १३ ऑगस्ट जागतिक अवयव दान दिन आहे. अवयवदानाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. लोकांना अवयवदानाचे महत्त्व समजावे आणि याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.
तुमचा अंतिम निर्णय तुमचा सर्वात मोठा असू शकतो! ही थीम यावर्षीची अवयव दानाची आहे.
अवयवदानाचे प्रकार :
-
-
मरणोत्तर अवयवदान : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे अवयव दान करणे.
जिवंतपणी अवयवदान : जिवंतपणी एखादे अवयव (जसे की मूत्रपिंड) किंवा ऊती (tissue) दान करणे.
-
भारतात अवयवदान :
-
भारतात, अवयवदानासाठी कुटुंबाची संमती आवश्यक असते.
-
जर एखाद्या व्यक्तीला अवयवदान करायचे असेल, तर त्याला किंवा तिच्या कुटुंबाला याबाबत नोंदणी करावी लागते.
नोंदणी :
अवयव दानासाठी नोंदणी करणे गरजेचे असते. नोंदणी करताना आपल्या कुटुंबीयांना याची कल्पना द्यावी लागते. भारतात “ORGAN India” किंवा “NOTTO” सारख्या संस्थांमार्फत नोंदणी करता येते.
एक अवयव दाता (donor) आपल्या मृत्यूनंतर 8 ते 9 जणांचे प्राण वाचवू शकतो. हृदय, यकृत (liver), मूत्रपिंड (kidneys), फुप्फुसं (lungs), नेत्र (डोळे) यांसारखे अवयव दान करता येतात. अवयव प्रत्यारोपणामुळे अनेकांना जीवन जगण्याची नवी संधी मिळते. जे रुग्ण वर्षानुवर्षे डायलिसिस किंवा उपचारांवर अवलंबून असतात, त्यांना मुक्तता मिळते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू इतरांसाठी आशेचा किरण ठरतो. मृत्यूनंतरही आपलं शरीर उपयोगी पडल्याचं समाधान मिळू शकतं. अवयव दान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. यामुळे समाजात मदतीची भावना वाढते व लोक एकमेकांसाठी पुढे येतात. भारतात हजारो रुग्ण योग्य अवयवाच्या प्रतीक्षेत असतात. अवयव दात्यांची संख्या वाढल्यास ही प्रतीक्षा कमी होऊ शकते.
———————————————————————————————-