कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार, वेतन आयोग, महागाई भत्ता, अन्य सुविधा आणि त्यांचे काम याची चर्चा नेहमीच होत असते. अनेकाना त्यांच्याविषयी हेवा वाटत असतो. खासगी क्षेत्रात मात्र वेतन व भत्ते अगदी काटेकोर दिले जातात. आता असे होणार नाही. सरकारी कर्मचार्यांच्या पगाराचे निकष बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात एक नवा नियम लागू होत आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक असेल. सरकारी कर्मचाऱ्यांनी आयजीओटी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाइन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत असे निर्देश या धर्तीवर जारी करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रम कसा असेल : प्रत्येक मंत्रालय, विभाग, संघटना आणि संबंधित नियंत्रण प्राधिकरण विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी किमान सहा अभ्यासक्रम निश्चित करतील. जिथं, नऊ वर्षे, १६ वर्षे आणि त्याहून जास्त वर्षे. २५ आणि त्याहून अधिक वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कर्मचारी सेवेनुसार अभ्यासक्रम निर्धारित केला जाईल. ज्यापैकी किमान ५० टक्के अभ्यासक्रम कर्मचाऱ्यांनी पूर्ण करणं अपेक्षित असेल. ज्याची आकडेवारी वार्षिक मूल्यांकन अहवालामध्ये जोडली जाईल. हे मूल्यांकन त्यांच्या अधिकृत कामगिरीच्या नोंदींचा एक भाग असेल.
सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि सेवा नोंदींसाठी हे कोर्स उत्तीर्ण करावे लागतील. ज्याचा थेट परिणाम मूल्यांकन अहवाल आणि प्रमोशनवर होणार असून, अभ्यासक्रमाची माहिती ‘स्पॅरो’ या ऑनलाइन मूल्यांकन प्रणालीशी जोडली जाईल. कर्मचारी जोपर्यंत कोर्स पूर्ण करत नाहीत तोपर्यंत मूल्यांकन अपूर्ण राहील आणि याचा थेट परिणाम कर्मचाऱ्याच्या प्रगतीसह बढती आणि सेवेवर होणार आहे.