कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
रस्त्यांचे जाळे भारतात मोठे आहे. मात्र रस्ते तयार करण्यातील दोष आणि देखभालीचा अभाव यामुळे दर्जेदार रस्ते तयार होत नाहीत, रस्ते खराबही अल्प कालावधीत होतात. रस्ते तयार करण्यासाठी अत्याधुनिक साधने असूनही दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते होत नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनाचा अपव्यय होतो.
रस्ते राष्ट्राच्या विकासाची वाहिनी
रस्ता हा राष्ट्राच्या विकासाची वाहिनी आहे. शरीरात जसे रक्त वाहिनीला महत्त्व आहे तसेच राष्ट्राच्या विकासात रस्त्यांना फार महत्त्व आहे. रस्ते हे एक दळणवळणाचे उत्कृष्ट माध्यम आहे. रस्त्यांमुळे अगदी निर्जन गावापर्यंत पोहचता येते. देशाच्या सर्वांगीण आणि सर्व प्रदेशाच्या विकासासाठी मजबूत, दीर्घकाळ टिकणारे, गुळगुळीत रस्ते हवेत.
भारतात सर्वात जास्त रस्ते
जगात सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे भारतात आहे. भारतात डिसेंबर २०२४ पर्यन्त ६६ लाख १७ हजार १०० किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते आहेत. भारतात रस्त्यावरून ७१ टक्के पेक्षा जास्त मालवाहतूक आणि ८५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होते. शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास होण्यात रस्त्यांचा फार मोठा वाटा आहे.
रस्ते बांधतांनाच पाया भक्कम असेल तर भविष्यातील समस्या खूप कमी होतात. याचबरोबर साधनांचा अपव्यय होत नाही. नैसर्गिक संसाधनेही टिकून राहतील. रस्ते बांधकामासाठी स्टील, सीमेंट, कॉँक्रीट, रेडी मिक्स कॉँक्रीट, बंधन तार, लाकूड, दगड, विटा, ब्लॉक्स, ब्लॉक्स आणि समुच्चय वापरले जाते. समुच्चयात चुरा केलेले दगड, खडी, वाळू किंवा कॉँक्रीट आणि डांबर यासारख्या घटकांचा समावेश होतो. रस्ते दुरुस्तीसाठी स्टील वगळता इतर घटकांची आवश्यकता असते.
बंधक जैविक बिटूमेन
रस्ते बांधकाम कॉँक्रीट किंवा डांबर मिक्स खडी वापरुन केली जाते. अलीकडे ज्या प्लॅस्टिक पिशव्यांचा पुनरवापर आणि पुनरनिर्मितीसाठी वापर करता येत नाही आशा पिशव्यांचा वापर डाबरामध्ये केला जातो. डांबरामधील बितुमेन हा पादार्थ महत्वाचा असतो. बिटूमेन हा पेट्रोलियम पदार्थापासून तयार केला जातो. डाबरांमध्ये बिटूमेन हा चिकट असणारा महत्त्वाचा घटक असतो. अलीकडे जैविक बिटूमेनचा वापर डाबरांमध्ये केला जातो. जैविक बिटूमेनची निर्मिती प्रक्रिया पर्यावरण पूरक आहे. जैविक बिटूमेन भाजीपाला, झाडांचे खोड , शेवाळ, लिगणिण [लाकडाचा एक घटक] किंवा प्राण्याची विष्ट यासारख्या अक्षय स्त्रोतापासून बनविला जातो. नागपूरनजिक मनसरजवळ रस्ते बांधणीसाठी जैविक बितुमेनचा उपयोग केला आहे.
तर कोट्यावधी रुपये वाचतील
जैविक बिटूमेनचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास कमी खर्चात आणि नेहमीच्या डांबरापेक्षा ४० टक्के अधिक मजबूत रस्ते तयार करता येतील. भारतात रस्ते बांधणीसाठी ४० लाख टन डांबर लागते. यापैकी ४५ हजार टन डांबर रिफायणरिमधून येते किंवा आयात करावे लागते. त्यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होतो. जैविक बिटूमेनचा वापर रस्ते बांधणीत केल्यास रस्ते निर्मितीचा खर्च कमी होईल असा दावा जैविक बिटूमेनचे अभ्यासक करतात.
पुनरवापर आणि पुनरनिर्मिती होत नसणारे प्लॅस्टिक खंडित मिसळून १५० अंश सेल्सिअस पर्यन्त उष्णता दिल्यास खडीला प्लॅस्टिकचे आवरण चढते यामध्ये जैविक बिटूमेन मिसळून रस्त्यावर अंथरल्यास वाढत्या उष्णतेचा, पावसाचा आणि अधिक भारवाहनाचा परिणाम आशा रस्त्यावर होत नाही.
रस्ते तयार करण्यासाठी वापरली जाणारी साधने :
भूमी मोजणी आणि सर्वेक्षणासाठी –
- थिओडोलाइट (Theodolite) – मोजणीसाठी, GPS उपकरणे – अचूक स्थान मोजण्यासाठी, लेव्हल मशीन (Auto Level) – उतार मोजण्यासाठी, मेझरिंग टेप / चेन – लांबी मोजण्यासाठी.
- जमीन समतल करण्यासाठी –
- बुलडोझर (Bulldozer) – माती ढकलणे, समतल करणे यासाठी वापरले जाते. , ग्रेडर (Grader) – सपाटीकरणासाठी वापरले जाते, स्क्रॅपर (Scraper) – माती काढण्यासाठी.
माती खणणे आणि भराव टाकणे –
एक्सकेव्हेटर (Excavator) – खणण्यासाठी, बॅकहो लोडर (Backhoe Loader) – खणणे आणि उचलणे, डम्पर ट्रक (Dumper Truck) – माती / खडी वाहतूक., बेस आणि सबग्रेड तयार करणे – रोलर (Roller / Road Roller) – दाबून घनता वाढवणे (किंवा कंप्रेशन), रोलरमध्ये सिंगल ड्रम रोलर, टँडेम रोलर, व्हायब्रेटरी रोलरअसे प्रकार आहेत.
डांबरीकरणासाठी (Asphalt / Bitumen Work) –
- अॅस्फाल्ट मिक्सर प्लांट (Hot Mix Plant) – डांबर मिक्स तयार करणे पॅव्हर मशीन (Paver) – डांबर रस्त्यावर घालण्यासाठी, बिटुमन स्प्रेअर (Bitumen Sprayer) – डांबरी लेप साठी, टँडेम रोलर / व्हायब्रेटरी रोलर – मिक्सिंग नंतर दाबण्यासाठी
- काँक्रीट रस्त्यासाठी – काँक्रीट मिक्सर मशीन, व्हायब्रेटर (Needle Vibrator) – एअर बबल्स काढण्यासाठी, फिनिशर मशीन – सपाट पृष्ठभाग मिळवण्यासाठी
- सुरक्षा व चिन्हांकनासाठी – साइन बोर्ड आणि कोन, रोड मार्किंग मशीन, बॅरिकेडिंग साहित्य
वाहतुकीची घनता, हवामान, स्थानिक व भौगोलिक परिस्थिती याचा अभ्यास करून रस्ता तयार केला जातो. रस्ते तयार करण्यासाठी थरानुसार विविध आकाराची खाडी वापरली जाते. जीएसबी खडी, डब्ल्यूएमएम खाडी, डीबीसी खडी, बीएम खडी, स्क्रीनिग खडी, साधी क्रशर खाडी असे खडीचे प्रकार असून यापैकी थरानुसार आवश्यक ती खडी वापरावी लागते. अशा विविध प्रकारच्या खडीसाठी बंधन म्हणून कसलीही भेसळ नसलेले बिटूमेन तीन ते सहा टक्के पर्यंत वापरणे आवश्यक असते.
रस्ते निर्मितीत नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. बिटूमेन, प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला आहे. याचबरोबर रस्ते निर्मिती करण्यासाठी प्रत्येक कामासाठी स्कवयंचलीत मशीनरीही उपलब्ध आहे. मात्र रस्ते करण्यात शास्त्रीय पद्धतीचा व आधुनिक साधनांचा नेमकेपणाने वापर केला जात नाही. यामुळे रस्त्यावर लवकर खड्डे पडतात, रस्त्याच्या समपातळी बरोबरच डहाळ नसतो. डहाळ व समपातळी नसल्याने पाणी साचते. काम काटेकोरपणे न केल्याने रस्ते मजबूत आणि दर्जेदार होत नाहीत. यामुळे श्रम वाया जातात. सर्वात महत्वाचे हे की रस्ते करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दगडांचा वापर होतो. दगडांसाठी डोंगरच्या डोंगर सपाट होत आहेत. दगड खांनीमुळे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. यामुळे पर्यावरणाचा रास होत आहे. आपल्याला विकासही पाहिजे आणि आरोग्यासाठी पर्यावरणही पाहिजे. यासाठीच रस्ते निर्मिती करताना शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करणे अत्यावश्यक आहे.