नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जगातील अव्वल विद्यापीठांपैकी एक असलेल्या हार्वर्ड विद्यापीठाने ‘ सर्वांसाठी शिक्षण ’ ( Education for All ) हे ध्येय समोर ठेवून शेकडो विनामूल्य ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. हार्वर्डच्या अधिकृत वेबसाइटवर ( pll.harvard.edu ) तसेच YouTube सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे कोर्सेस विद्यार्थ्यांना सहजपणे पाहता व शिकता येणार आहेत.
या उपक्रमामुळे जगभरातील विद्यार्थी घरबसल्या दर्जेदार आणि जागतिक स्तरावरील शिक्षण घेऊ शकतील. विविध क्षेत्रातील सखोल ज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या या कोर्सेसमध्ये आर्ट, डिझाइन, व्यवसाय, कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, शिक्षण, मानव्यशास्त्र, गणित आणि विज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
काही महत्त्वाचे विनामूल्य कोर्सेस :
-
CS50 : Introduction to Computer Science – अल्गोरिदम, समस्या सोडवण्याचे तंत्र तसेच C, Python, SQL आणि JavaScript सारख्या प्रोग्रामिंग भाषांचे शिक्षण.
-
CS50: Introduction to AI with Python – सात आठवड्यांच्या या कोर्समध्ये ग्राफ सर्च अल्गोरिदम, मशीन लर्निंग, रिइंफोर्समेंट लर्निंग आणि AI ची मूलभूत तत्त्वे.
-
Rhetoric: The Art of Persuasive Writing and Public Speaking – प्रभावी संवादकौशल्य व सार्वजनिक बोलण्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी उपयुक्त कोर्स.
-
Introduction to Linear Models and Matrix Algebra – चार आठवड्यांचा कोर्स – मॅट्रिक्स बीजगणित आणि डेटा विश्लेषणातील वापर.
-
The Architectural Imagination – आर्ट व डिझाइन विद्यार्थ्यांसाठी वास्तुकलेचे नमुने वाचणे, विश्लेषण करणे आणि त्यांचे अर्थ लावणे शिकवणारा कोर्स.
-
Early Childhood Development: Global Strategies for Interventions – लहान मुलांच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रभावी धोरणे; पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त.
-
Resilient Leadership – ‘शॅकल्टन’ आणि त्याच्या टीमच्या साहसी प्रवासातून नेतृत्वाचे महत्त्वपूर्ण धडे शिकवणारा कोर्स.



