प्रसारमाध्यम डेस्क
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज महाडिबीटी या ऑनलाईन प्रणालीवरुन दिनांक १५ जून २०२५ पर्यंत भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ दि. २५ जुलै २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
अर्ज भरणेसाठी मोजकेच काही दिवस शिल्लक असल्याने उर्वरीत विद्यार्थ्यांनी तात्काळ महाडिबीटी शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जाची छाननी करुन परीपूर्ण अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे अवाहनही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.



